Home > News Update > जागा वाटपावरून INDIA आघाडीत बिघाडी

जागा वाटपावरून INDIA आघाडीत बिघाडी

जागा वाटपावरून  INDIA आघाडीत बिघाडी
X

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडी मतभेद निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एकमेकांना चॅलेंज देऊ नका. तर भाजपाला कसं रोखायचे ते ठरवा. सगळे समान आहेत. एकदिलाने सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावेत. सगळ्या जागा तुम्ही मागणार मग आम्ही कुठे लढायचे ? असा संतप्त सवाल निरुपम यांनी राऊतांना केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात लढणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याची तयारी देखील सूरू झाली होती परंतू जागा वाटपावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत मतभेड झाले आहेत. दरम्यानं वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी येण्याची तयारी दर्शवत आहे. प्रकाश आंबेडक यांनी देखील यावर पत्र लिहत जागा वाटपाचा १२ -१२ चा फॉर्म्यूला ठेवला आहे. दरम्यानं शिवसेना ठाकरे गट २३ जागा लढवणार असल्यांच्या भूमिकेत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल आम्ही आज नागपुरात वाजवणार आहोत. कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे. बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी, सर्वधर्म समभावाने लोकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेस तयार आहेमुंबई उत्तर पश्चिम जागेबाबत कधीही तडजोड करणार नाहीही जागा काँग्रेसची आहे. त्याठिकाणी काँग्रेसची ताकद असल्याचं संजय निरूपम म्हणाले आहेत

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्र कॉंग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल. आम्ही २३ जागा लढवणार आहोत, हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत त्यांमुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीचं INDIA आघाडीचं जागावाटपाचं अंकगणित काय असेल हे पाहावं लागणार आहे.

Updated : 29 Dec 2023 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top