Home > News Update > राज्यात दिवसभरात 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त
X

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेच. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३२% एवढे झाले आहे. तर राज्यात दिवसभरात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात ९२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. राज्यात सध्या ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर ३२,१७४ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६ लाख ४१ हजार ५९६ एक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईमध्ये रुग्णसंख्या पुन्हा कमी झाली आहे. दिवसभरात मुंबईत 3 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत. तर 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 3390 रुग्ण आढळे असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.







Updated : 5 May 2021 3:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top