Home > News Update > मुंबईच्या औद्योगिक प्रगतीसाठी BIAचे नवे पाऊल

मुंबईच्या औद्योगिक प्रगतीसाठी BIAचे नवे पाऊल

मुंबईच्या औद्योगिक प्रगतीसाठी BIAचे नवे पाऊल
X

मुंबई- बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन या भारतातील उद्योजकांच्या संघटनेचा ५७ वा पदग्रहण सोहळा नुकताच अंधेरीत पार पडला. राज्याचे परिवहनमंत्री ऍड.अनिल परब हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी पिरॅमिड इंडस्ट्रीजचे सीईओ संजय शाह यांनी वर्ष २०२१ चे बीआयएचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन प्रयत्न करेल असे यावेळी संजय शाह यांनी सांगितले.

सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला उत्तम सुविधा असलेले जागतिक स्तरावरील उत्पादन केंद्र बनविणे हे आमचे उद्दीष्ट असून २०३० पर्यंत अनेक क्षेत्रात आपण चीनपेक्षा दर्जेदार आणि स्वस्त असे उत्पादन व सेवा निर्माण करु, असा दावाही त्यांनी केला. हे ध्येय साध्य करण्यासाठी बीआयए डिजीटल पद्धतीने विक्री वाढवेल. दिल्ली-मुंबई ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर व मुंबई येथे जागातिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करु करण्यचाचे नियोजन असल्याचचे त्यांनी सांगितले. तर राज्याच्या प्रगतीसाठी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनसारख्या संस्थेला नेहमीच मदतीचा हात देऊ असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

Updated : 20 Jan 2021 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top