Home > News Update > अर्णबला हायकोर्टात `नो-बेल`

अर्णबला हायकोर्टात `नो-बेल`

एकाच वेळी तालुका दंडाधिकारी, सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी दिग्गज वकिलांची फौज उभी करणाऱ्या अर्नब गोस्वामीला आज मुंबई न्यायालयात तोंडघशी पडावे लागले.

अर्णबला हायकोर्टात `नो-बेल`
X

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी २०१८ मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीनासाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय जाहीर केला. जामीन घेण्यासाठी चार दिवसांत निर्णय घ्यावा लागेल, हे लक्षात घेऊन कोर्टाने गोस्वामी यांना नियमित जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य दिले.

त्यानंतर तातडीने गोस्वामीने जामिनासाठी अलीबाग येथील सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. गेली तीन दिवस याबाबत उच्च न्यायालयात मॅरथॉन सुनावणीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व पक्षकारांची बाजू ऐकुण घेऊन जामीन नाकारला.


Updated : 9 Nov 2020 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top