Home > News Update > Sushant Singh Rajput Case: 'एनसीबीच्या कार्यालयात जे घडतंय, ते बाहेर कसं येतंय?'

Sushant Singh Rajput Case: 'एनसीबीच्या कार्यालयात जे घडतंय, ते बाहेर कसं येतंय?'

Sushant Singh Rajput Case: एनसीबीच्या कार्यालयात जे घडतंय, ते बाहेर कसं येतंय?
X

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये ड्रग्ज रॅकेट असल्याचं समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार ची नाव समोर येत आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर व सारा अली खान यांची या प्रकरणात चौकशी झाली. मात्र, NCB च्या कार्यालयात बंद दाराआड जी चर्चा झाली. त्यातील चौकशीची माहिती माध्यमांना कशी मिळते? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे?

'मीडियात होत असलेल्या चर्चा वास्तवावर आधारलेल्या नाहीत असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पुढं येऊन स्पष्ट करायला हवं. 'एनसीबी' तसं करत नसेल तर मीडियातून दिली जाणारी माहिती खरी आहे आणि एनसीबीकडून जाणीवपूर्वक ती फोडली जात आहे, असा त्याचा अर्थ होईल. एनसीबी खरोखरच तसं करत असेल तर ते अत्यंत अयोग्य आणि दु:खदायक म्हणावं लागेल,' असं म्हणत 'एनसीबीच्या कार्यालयात जे घडतंय, ते बाहेर कसं येतंय?' असा सवाल केला आहे.

Updated : 26 Sept 2020 5:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top