Home > News Update > खुशखबर ! विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाई थांबणार.., पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मानले आभार

खुशखबर ! विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाई थांबणार.., पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मानले आभार

कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध अखेर मागे घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर विनामास्क फिरणारांवर कारवाई थांबवण्याबाबत मुंबई महापालिकेने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

खुशखबर ! विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाई थांबणार.., पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मानले आभार
X

कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध अखेर मागे घेत असल्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे गुढीपाडव्यापासून नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. त्यातच मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुंबई महापालिकेने पत्र पाठवून विनामास्क फिरणारांवर कारवाई थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यावरून संजय पांडे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे आभार मानले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात विनामास्क फिरणाऱ्यांवर 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेने पोलिसांना दिले होते. परंतू राज्य सरकारने कोरोना निर्बंध संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर होणारी दंडात्मक कार्यवाही थांबवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने पोलिसांना दिले आहेत. तसेच कार्यवाहीतील दंडात्मक रक्कम आणि पावती पुस्तके महापालिकेकडे जमा करावीत, अशी विनंती केली आहे.

त्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी हे पत्र ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रेट न्यूज. महापालिकेने विनामास्क फिरणारांवरची कार्यवाही थांबवली आहे. याबाबत मुबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नागरिकांचे मत ऐकले. त्याबद्दल त्यांचे खुप आभार, अशा आशयाचे ट्वीट केले आहे.Updated : 1 April 2022 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top