Home > News Update > 'अधिश' बंगल्याप्रकरणी नारायण राणे यांना मोठा झटका

'अधिश' बंगल्याप्रकरणी नारायण राणे यांना मोठा झटका

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि मुंबई महापालिका यांच्यात संघर्ष रंगला आहे. त्यातच राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याप्रकरणी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने हा नारायण राणे यांना मोठा झटका मानला जात आहे. (BMC)

अधिश बंगल्याप्रकरणी  नारायण राणे यांना मोठा झटका
X

राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुध्द शिवसेना (Rane Vs Shivsena) वाद चांगलाच रंगला आहे. तर नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेला टार्गेट केले होते. तर शिवसेनेने संतोष परब प्रकरणावरून नितेश राणे यांच्यावरचा कारवाईचा फास आवळला होता. त्यामुळे राणे विरुध्द ठाकरे वाद राजकीय चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्यानंतर हा वाद मागे पडला आहे असे वाटत असतानाच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने राणे यांचा जुहू येथील अधिश या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावरून नोटीस पाठवली असल्याने पुन्हा एकदा राज्यात राणे विरुध्द शिवसेना वाद रंगण्याची चिन्हे आहेत. (BMC Noticed to Narayan Rane for Adhish bungalow)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' बंगल्यावरून राज्यात राजकारण रंगले होते. त्यातच मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याची चौकशी करण्याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी केली. यामध्ये राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढळून आले. त्यामुळे राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यात येण्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र राणे यांनी त्यावर कोर्टाकडून स्थगिती मिळवली.

नारायण राणे यांच्या आठ मजली अधिश बंगल्याप्रकरणी नारायण राणे यांनी अनधिकृतरित्या केलेले बांधकाम नियमीत करण्याबाबत मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र पालिकेने हा अर्ज फेटाळून लावला आहे. तर हा केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमीत करण्याच अर्ज फेटाळला असतानाच महापालिकेने नारायण राणे यांना कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी 15 दिवसांची मुदतही दिली आहे.

Updated : 19 April 2022 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top