Home > News Update > आर्थिक मंदीमुळे बीएमसीचं ‘बजेट’ बिघडलं

आर्थिक मंदीमुळे बीएमसीचं ‘बजेट’ बिघडलं

आर्थिक मंदीमुळे बीएमसीचं ‘बजेट’ बिघडलं
X

देशात असलेल्या आर्थिक मंदीचा मोठा फटका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेलाही बसलाय. महापालिकेचं २०२०-२१ या वर्षासाठीचं बजेट आज सादर करण्यात आले. पण या बजेटमध्ये मालमत्ताकराची थकबाकी १५ हजार कोटींवर गेल्याचं नमूद करण्यात आले आहे. तर महापालिकेतील रिक्त पदांवरील भरतीलाही ब्रेक लावण्यात आला आहे. अर्थसंकल्पावरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्यानं 250 कोटी रुपयांची बचत होणार आहे. आयुक्तांनी आज 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई महानगपालिकेच्या अर्थसंकल्पात यावेळीही कुठलीही करवाढ करण्यात आली नाही. आर्थिक मंदीमुळे पालिकेच्या उत्पन्नाला कात्री लागली आहे. त्यामुळे पालिकेचं उत्पन्न वाढण्यासाठी या अर्थसंकल्पात दोन नवे कर प्रस्तावित करण्यात आलेत. कचरा संकलन शुल्क आणि मलजल संकलन शुल्क अशे दोन कर आहेत. या कराच्या माध्यमातून ३ हजार कोटी उत्पन्न गोळा कऱण्याचा प्रस्ताव पालिकेचा आहे.

पाहूया बजेटमध्ये काय काय तरतूदी करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील पूल बांधणीसाठी 799 कोटी रुपयांची तरतूद

मिठी नदी स्वच्छतेसाठी ७० कोटी, नालेसफाईसाठी 50 कोटींची तरतूद

मुंबईतील सिमेंट आणि डांबरी रस्त्यासाठी 1600 कोटींची तरतूद

कोस्टल रोडसाठीची तरतुद गेल्यावर्षांच्या 1600 कोटींवरुन 2000 कोटी

गोरेगाव - मुलुंड लिंक रोडच्या चार टप्प्यांसाठी 300 कोटींची तरतूद

Updated : 4 Feb 2020 10:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top