Home > News Update > मुंबईकरांसाठी महापालिका खरेदी करणार लस, आदित्य ठाकरेंच्या प्रशासनाला सूचना

मुंबईकरांसाठी महापालिका खरेदी करणार लस, आदित्य ठाकरेंच्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला काही सूचना केल्या आहेत.

मुंबईकरांसाठी महापालिका खरेदी करणार लस, आदित्य ठाकरेंच्या प्रशासनाला सूचना
X

मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. या लसींची पुरेशी उपलब्धता व्हावी यासाठी कोरानावरील लसींची जागतिक पातळीवर खरेदी करता येऊ शकते का याची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

लसीकरीता नोंदणीसाठी नवा पर्याय?

सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

याशिवाय मुंबईची लसींची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा आपल्या विनंतीनंतर घेण्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री ठाकरे यांनी दिली.

राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम राबवण्याचे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Updated : 10 May 2021 4:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top