Home > News Update > #BMC साठी आरक्षण सोडत जाहीर : दिग्गजांना धक्का; नवी राजकीय समीकरणे

#BMC साठी आरक्षण सोडत जाहीर : दिग्गजांना धक्का; नवी राजकीय समीकरणे

#BMC साठी आरक्षण सोडत जाहीर : दिग्गजांना धक्का; नवी राजकीय समीकरणे
X

राज्य व राज्याच्या आगामी राजकारणावर परीणाम करणाऱ्या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज सोडतीमधे सर्वपक्षीय शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला असून त्यांचे वॉर्ड महिलांसाठी आणि इतर संवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसऱ्या वॉर्डतून लढावे लागणार आहे.

शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

तर काही वॉर्डमधील आरक्षणामुळे देखील बऱ्याच विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे. त्याचवेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना दिलासा मिळाला आहे. गतवेळी संदीप देशपांडे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी रिंगणात होत्या.मात्र शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी त्यांच्या पराभव केला होता.

बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला असून त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२२ करता एकुण २३६ वॉर्ड - या पैकी ११८ महिलांसाठी

यात सर्वसाधारण महिलांसाठी -

प्राधान्यक्रम १ (५३) प्रभाग क्रमांक - २, १०, २१, २२, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८६, ९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १५९, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३० व २३६

प्राधान्य क्रम २ (३३) प्रभाग क्रमांक - ५, २८, २९, ३९, ४५, ४६, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ९२, १०३, १२०, १२५, १३१, १४२, १४७, १५१, १६३, १६८, १७७, १८१, १८६, १८७, १९६, २२०, २२५, २२६, २२७, २३१, २३३ व २३४

प्राधान्य क्रम ३ (६३) प्रभाग क्रमांक - ३, ६, ७, ९, ११, १२, १३, १४, १६, १९, २७, ३०, ३२, ४१, ४२, ४३, ४४, ५०, ५३, ६२, ७०, ७५, ७७, ७९, ८१, ८२, ८३, ८४, ८७, ८८, ९१, ९३, ९६, ९९, १०१, १०२, ११७, १३०, १३२, १३६, १३७, १४६, १४८, १५४, १५५, १५८, १६०, १६४, १६६, १६७, १७६, १७९, १८५, १८८, १९९, २००, २०३, २१४, २१६, २१७, २२२, २२३ व २३२

१५ अनुसूचित जाती :

प्रभाग क्रमांक - ६०,८५,१०७,११९,१३९,१५३,१५७,१६२,१६५,१९०,१९४,२०४,२०८,२१५ आणि २२१ हे अनुसुचित जातीसाठी राखीव.

या पैकी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणारे प्रभाग - ८५, १०७, ११९, १६५, १९०, १९४, २०४

२ अनुसूचित जमाती :

प्रभाग क्रमांक - ५५, १२४

BMC announce reservations new political equations

- १२४ राखीव.

Updated : 31 May 2022 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top