लातूर लोकसभा मध्ये भाजपचा डाव फसला...!
X
लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे...लोकसभा तिकीट जाहीर करण्यापूर्वी भाजपा ने केलेल्या सर्वे मधे विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या बद्दल नकारात्मकता पक्षाला दिसून आली...५ वर्षे केवळ इव्हेंट आणि जयंती मधेच खासदार दिसले त्यामुळे पक्ष त्यांचे तिकीट बदलणार अशा आशयाचे वृत्त अनेक वाहिन्यांवर पाहायला मिळाले...त्यांच्याऐवजी विश्वजीत अनिलकुमार गायकवाड,सुधाकर भालेराव,अनिल कांबळे,दिग्विजय काठवते यांचे नाव आघाडीवर पाहायला मिळाले परंतु पक्षाने पुन्हा एकदा सुधाकर श्रुंगारे यांना तिकीट देऊ केले.
लातूर लोकसभा भाजप उमेदवार बदलण्याची चर्चा..
लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असताना यावेळेस सुधाकर शृंगारे याना उमेदवारी दिल्याने आणि काँग्रेसने याचाच फायदा उचलत उच्च शिक्षित डॉ.शिवाजी काळगे याना उमेदवारी दिल्याने भाजपला ही निवडणूक डोकेदुखी ठरते कि काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू असून भाजप महाराष्ट्रातील चार उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे..यात लातूर,जळगाव,माढा या जागांचा समावेश आहे. लातूर एक सुशिक्षित असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस उमेदवारींमुळे रंगत आली असून मतदारांनी ही निवडणूक चक्क सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी करून टाकली आहे..
लातूर लोकसभेत भाजपचे खासदार शृंगारे अडचणीत..
उमेदवारी मिळाल्यावर पत्रकारांनी विकासकामांवर प्रश्न विचारला असता खासदार शृंगारे म्हणाले पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे मी विजयी होणार,त्यांना कुठलीही कामे सांगता आली नाहीत हे खरे दुर्दैव आहे. जिल्ह्याची आजवरची उच्चशिक्षित परंपरा पाहता काँग्रेसने यावेळेस चांगला पर्याय दिलेला दिसून येत आहे,महाराष्ट्रातील चार ते पाच जागांवर तिकिटे बदलण्यासंदर्भात खाजगीत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी कळवले आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता काँग्रेसने उमेदवार लिंगायत,उच्चशिक्षित आणि नामवंत डॉक्टर दिल्याने त्यासमोर उच्चशिक्षित उमेदवार असेल तर भाजपला 400 पार जायला सोपे जाऊ शकते. मात्र विद्यमान भाजप उमेदवार पाच वर्षात केवळ बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी करणारा असल्याने आता विकासावर आणि शिक्षणावर चर्चा सुरू झाली आहे असा काँग्रेसचा आरोप आहे..भाजपच्या केंद्रीयधोरणांनुसार 400 पार करायचे असेल तर पुन्हा नव्याने या मतदारसंघाच्या उमेदवारीचा विचार भाजप करेल काय?आणि तोही सुशिक्षित उमेदवार देऊन काँग्रेसससमोर आव्हान उभे करेल काय ?हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा खाजगीत उमेदवार बदलाच्या बातम्यांना दुजोरा देताना दिसत आहेत. कारण वातावरण हे पक्षाच्या विरोधात नसून उमेदवाराच्या विरोधात आहे. ग्रामीण भागामध्ये अनेकांना आपला आधीचा खासदार कोण असे विचारले असता त्यांना सांगता आले नाही.
अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्ष प्रवेश भाजपाने करून घेतला असला तरी काही दिवसापूर्वी त्यांच्या एका दिल्ली,पंजाब याठिकाणी असलेल्या कंपन्यांवर ED CBI च्या धाडी पडल्यामुळे त्यांनी पक्ष प्रवेश केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर viral होताना दिसत आहेत...
त्यामुळे त्यांच्या येण्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फार मदत मिळणार नाही असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तूर्तास भाजपाचा डाव फसला आहे कि काय यावर चर्चा सुरु आहे.