Home > News Update > Loksabha 2024: bjp ची 195 उमेदवारांची यादी जाहीर, मोदी वाराणसीतून तर शाह गांधीनगर मधून लढणार

Loksabha 2024: bjp ची 195 उमेदवारांची यादी जाहीर, मोदी वाराणसीतून तर शाह गांधीनगर मधून लढणार

Loksabha 2024: bjp ची 195 उमेदवारांची यादी जाहीर, मोदी वाराणसीतून तर शाह गांधीनगर मधून लढणार
X

LokSabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने (BJP) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (BJP First List) केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून तर गृहमंत्री अमित शाह हे गांधीनगर मतदार संघातून रिंगणार उतरणार आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित (Bjp Candidate List) करण्यात आलं नाहीय. तर देशातील १६ राज्यांच्या महत्वाच्या उमेदवारांची यादी घोषीत करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा केली, दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत त्या भागातील स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली." 29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत कोणत्या राज्यात किती उमेदवार ?

उत्तर प्रदेश - 51

पश्चिम बंगाल - 20

मध्यप्रदेश -24

तेलंगणा - 9

दिल्ली - 5

राजस्थान - 15

उत्तराखंड - 5

गुजरात -15

जम्मू काश्मीर -2

अरुणाचल प्रदेश - 2

केरळ -12

त्रिपूरा -1

आसाम - 11

गोवा - 1

अंदमान निकोबार -1

झारखंड -11

दादरा नगर हवेली -1

छत्तीसगड - 11


पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली. तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये. त्यामुळे आता देशात भाजपला काँग्रेस तोडीसतोड उमेदवार देणार का ?. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 3 March 2024 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top