Home > News Update > #boycottchina- चीनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यासाठी आंदोलन

#boycottchina- चीनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यासाठी आंदोलन

#boycottchina- चीनी कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यासाठी आंदोलन
X

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आणि त्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनचा निषेध म्हणून आणि चीनची कोंडी करण्यासाठी चीनी मालावर बहिष्कार टाका अशी मागणी आता वाढू लागली आहे.

मुंबईत मेट्रोचे काम सुरू आहेत. यामध्ये मेट्रो स्टेशनवर सरकत्या जिन्यांचे कंत्राट एका चिनी कंपनीला देण्यात आले आहे. ते रद्द करण्यात यावं अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे सुभ्रांशू दिक्षित यांनी केलेली आहे. याच मागणीसाठी एमएमआरडीएच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन देखील केले.बॉयकॉट चायना अशा आशयाचे फलक टघेऊन त्यांनी हे आंदोलन केलं

Updated : 20 Jun 2020 2:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top