Home > News Update > सावरकर गौरवाचा भाजपचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

सावरकर गौरवाचा भाजपचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

सावरकर गौरवाचा भाजपचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला
X

सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज विधिमंडळ अधिवेशनात भाजपनं सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडला होता. पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप हा प्रस्ताव मांडणार असल्याची चर्चा होती. पण अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

त्यानंतर भाजपच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या शिदोरी मासिकातून सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेल्याचा आरोप करत हे शिदोरी मासिक सभागृहात फाडलं. यावेळी विरोधकांनी 'सावरकांची बदनामी करणार्या सरकारचा धिक्कार असो' , 'शिवसेना शरम करो' अशी घोषणाबाजी करत सभागृहात फलक फडकावले आणि सरकारविरोधात घोषणा दिल्या. सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर कोँण काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस

“काँग्रेसचे साप्ताहिक ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर लिहून आलंय. स्वातंत्र्यवीर नाही बलात्कारी असं लिहिलंय, शिदोरी या मासिकावर बंदी आणा”

सुधीर मुनगंटीवार

“विनायक दामोद सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. अंदमान आणि निकोबारमध्ये अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्यावर अत्याचार झाले. पण त्यांची देशभक्ती तसूभरही कमी झाली नाही. शासनाने आज त्यांच्या पुण्यतिथीला गौरव प्रस्ताव मांडवा. 'देशासाठी सावरकरांचं कर्तुत्व अगणित आहे. त्यांचा आम्हाला अत्यंत आदर आहे एवढचं सरकारने निवेदन करावं ही अपेक्षा आहे.”

अनिल परब

“आधी सावरकरांना भारतरत्न द्या मग आम्ही मोदींच्या आणि विरोधकांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणतो.”

अजित पवार

“स्वातंत्रवीर सावरकरांचा स्मृतीदिन हा आजच आला नाही. याआधीही आले आहेत. मी त्यांना आदरांजली वाहतो. त्यांचं योगदान कोणीही विसरणार, पण उगाच कोणतेही मुद्दे काढून राजकीय स्वार्थ साधू नये. राज्याने दोन पत्र मोदींना पाठवले आहे. अजून भारतरत्न का नाही दिला? त्यांची गायींबद्दलची काय भूमिका हे मी इथे सांगणार नाही. व्यक्तींची मतं वेगवेगळी असू शकतात.”

Updated : 26 Feb 2020 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top