Home > News Update > भाजपा सांगली जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार

भाजपा सांगली जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार

भाजपा सांगली जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार
X

सांगली : शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजपा जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढविण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज संपन्न झाली.

या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक ही स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप जिल्हा बँकेच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना खो बसला. जे कोणी नाराज इच्छुक असतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. कोअर कमिटीच्या बैठकीत खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, माजी आ. विलासराव जगताप, दिनकर पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख उपस्थित होते.

Updated : 3 Nov 2021 3:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top