Home > News Update > ST संपामागे BJP चा हात?, Adv. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे स्पष्टता

ST संपामागे BJP चा हात?, Adv. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे स्पष्टता

गुणरत्न सदावर्ते यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्यामुळे संपामागे भाजपचा हात असल्याची शंका बळावली आहे.

ST संपामागे BJP चा हात?, Adv. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे स्पष्टता
X

28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू असलेला संप मागे घेण्याबाबत उच्च न्यायालयाने शेवटची संधी दिली आहे. तर कामगारांच्या विविध मागण्यांबाबत न्यायालयाने (High Court)सकारात्मक निकाल दिल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte )यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एसटी कामगार संपाच्या मागे भाजप असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पाच महिन्यांपासून राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटीची चाकं थांबली होती. त्यातच 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. मात्र राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली भुमिका यांमुळे हा संपाचा तिढा सुटण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. तर हा संप भाजपने चिघळवल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला होता. त्याला गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याने बळ मिळाले आहे. (ST Worker Strike)

उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याबाबत महत्वाची सूचना केली. त्याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्या. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी सदावर्ते म्हणाले की, ज्यांनी भुकेला अन्न दिले. त्याला राजकारण समजू नये. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis ), नवणीत राणा, भिमराव धोंडे, अनुराधा पौडवाल, यांनी पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना अन्न दिले. त्यांचं मी कौतूक करतो, अभिनंदन करतो. पण मी आभार मानणार नाही. कारण पोटाची भूक त्यांनी भागवलेली आहे.

एसटी संपात भाजप असण्याची शंका का?

एसटी संप सुरू झाल्यानंतर त्या संपाला भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच महत्वाच्या नेत्यांनी एसटी संपामध्ये हजेरी लावल्याने हा संप राजकीय असल्याची टीका करण्यात येत होती.

या संपात आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व हाती घेतल्यामुळे हा संप भाजप प्रेरीत असल्याचे म्हटले जात होते.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे या संपातून बाहेर पडल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे याबाबत शंका बळावत आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणि चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, भिमराव धोंडे, अनुराधा पौडवाल आणि नवणीत राणा यांचे आभार मानल्यामुळे या संपाला भाजपचा पाठींबा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Updated : 8 April 2022 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top