Home > Election 2020 > भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार
X

कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आज भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असं असून आज दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्य़ालयातून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

काय असणार जाहीरनाम्यात?

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याला टक्कर देणारा हा जाहीरनामा असण्याची शक्यता आहे. देशातील बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या नाराजीचा विचार करता या जाहीरनाम्यात तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी संकल्पपत्रात पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. तसंच देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या संकल्पपत्रात भाजप तरतुद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या गोष्टींचा भाजपच्या संकल्प पत्रात असू शकतो समावेश :

  • कलम 370 वर भाजपची भूमिका आज होऊ शकते स्पष्ट

  • महिला आणि विद्यार्थ्यांसाठी काही मोठ्या घोषणा

  • रोजगार आणि स्वंयरोजगार जास्तीत जास्त संधी निर्माण करणे

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार

  • शेतकऱ्यांसाठी मासिक पेन्शन योजना सुरु करणे

  • देशाच्या सुरक्षेबाबत काही महत्तपूर्ण तरतुद

Updated : 8 April 2019 10:33 AM IST
Next Story
Share it
Top