News Update
Home > News Update > हिमालयात जाण्यावरुन दादांची पलटी

हिमालयात जाण्यावरुन दादांची पलटी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी सोशल मिडीयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहे. हरलो तर हिमालयात जाईल, या त्यांच्या घोषणेवरुन त्यांना टार्गेट केलं जात असताना चंद्रकांत दादा यांनी आता मी हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटल्याची सारवासारव केली आहे.

हिमालयात जाण्यावरुन दादांची पलटी
X

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी सोशल मिडीयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहे. हरलो तर हिमालयात जाईल, या त्यांच्या घोषणेवरुन त्यांना टार्गेट केलं जात असताना चंद्रकांत दादा यांनी आता मी हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटल्याची सारवासारव केली आहे.

सोशल मिडीयावरुन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चंद्रकांतदादांना आठवण करुन दिली आहे.कोल्हापूर उत्तरची निडवणुक मोठ्या फरकानं जिंकत कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. मात्र सोशल मिडीयावर चंद्रकांत पाटलांच्या घोषणेची चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांना विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणतात, "नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर…!"

"कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन", असं विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केलं होतं.आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या त्याच विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर खुद्द चंद्रकांच पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

आमचे उमेदवार नाना पाटील हरले आहे. मी हिमालयात जाण्याची घोषणा मी हरलो तर हिमालयात जाईल अशी केली होती, अशी सारवासारव दादांनी केली आहे. कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. 'दादा हिमालयात जावा' अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.

Updated : 2022-06-13T15:09:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top