भाजप प्रवक्ते संबीत पात्रा रुग्णालयात दाखल

Courtesy : Social Media

भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संबीत पात्रा हे आजारी आहेत आणि त्यांची लक्षणं कोरोनासदृश्य आढळल्याने त्यांना गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संबीत पात्रा यांच्यात कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आली आहेत. त्यानंतर आज त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी त्यांची तपासणी आणि पुढील उपचार करण्यात येतील.

पात्रा हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असून विविध वृत्तवाहिन्यांवर ते भाजप आणि केंद्र सरकारची बाजू मांडत असतात.