Home > Election 2020 > व्हिडीओ : गिरीष महाजनांसमोरच माजी आमदाराला मारहाण

व्हिडीओ : गिरीष महाजनांसमोरच माजी आमदाराला मारहाण

व्हिडीओ : गिरीष महाजनांसमोरच माजी आमदाराला मारहाण
X

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथं बुथ कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी भाजपचे अमळनेर इथले माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की वाघ समर्थकांनी माजी आमदार पाटील यांना व्यासपीठावरच मारहाण करायला सुरूवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनाही धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण आटोक्यात आलं.

डॉ. पाटील आणि वाघ यांच्यात जुनाच वाद आहे. त्यातच वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना भाजपनं जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र ऐनवेळी ती रद्द केली. त्यामुळं वाघ समर्थकांमध्ये नाराजी होती.

Updated : 10 April 2019 2:09 PM GMT
Next Story
Share it
Top