‘होय मी सावरकर’ भाजपचं पुण्यात निदर्शन

पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपने ‘होय, मी पण सावरकर…’ अशी पोस्टर्स घेऊन राहुल गांधीच्या विरोधात निदर्शनं केली. भाजप शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी निदर्शनात सहभागी झाले. राहुल गांधींना सावरकरांच्या नखाची सर नाही. राहुल गांधींला विचार, ज्ञान आणि अभ्यास नाही. त्यामुळं सावरकरांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्या सारखं असल्याची टीका मिसाळ यांनी केली आहे.

शिवसेनेनं राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नरमाईची भुमिका घेतल्याने भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून सेना लेचीपेची झालीय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमिका कट्टर हिंदुत्ववादी होती मात्र, सेना सध्या गप्प आहे.” असा आरोप माधुरी मिसाळ यांनी केला आहे.