Home > News Update > पोलीसांनी भाजप पदाधिकाऱ्याला लाठ्या तुटेपर्यंत केली मारहाण

पोलीसांनी भाजप पदाधिकाऱ्याला लाठ्या तुटेपर्यंत केली मारहाण

पोलीसांनी भाजप पदाधिकाऱ्याला लाठ्या तुटेपर्यंत केली मारहाण
X

जाएका व्यक्तीला आठ-दहा पोलीस अधिकारी-कर्मचारी लाठ्या तुटेपर्यंत मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात हा व्यक्ती 'साहेब माफ करा, साहेब माफ करा' अशी याचना करताना दिसत आहे. तर हा व्हिडीओ जालना जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं असून, एप्रिल महिन्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये आयसीयू वार्डात जाऊन काही लोकांनी, आमच्या रुग्णावर व्यवस्थित उपचार न केल्याने दगावला असल्याचा आरोप करत तोडफोड केली होती. यात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारीयालवाले यांचाही समावेश होता.

यावेळी पोलिसांनी धाव घेत तोडफोड करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने त्यांनी लाठीचार्ज केला. तसेच काही लोकांना समज देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र याचवेळी पोलिसांचा नारीयालवाले यांनी गुपचूप व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला होता.

याचा राग आल्याने पोलिसांनी नारीयालवाले लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हातातील लाठ्या तुटेपर्यंत मारहाण सुरूच होती.

मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर 'एसीबी ट्रॅप'

या व्हिडीओत मारहाण करणारे तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर

यांना काही दिवसांपूर्वी 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडलेले होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्या मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे

यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत असून,भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे. मारहाण झालेला माणूस कुणीही असो, त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती. पण आशा पद्धतीने गुरांसारखं मारण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 27 May 2021 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top