Home > News Update > त्या आक्षेपार्ह शब्दाबद्दल रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया

त्या आक्षेपार्ह शब्दाबद्दल रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया

त्या आक्षेपार्ह शब्दाबद्दल रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया
X

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल पक्षाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द वापरला गेल्याचा प्रकार घडला आहे. यावर रक्षा खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला समजल्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. माझ्याकडे व्हाट्सएपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत, त्यात हा प्रकार 'सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी' म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे," असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी दिली आहे.


Updated : 28 Jan 2021 9:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top