राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. इम्पेरिकल डाटाचे कारण देत केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Updated : 7 Dec 2021 10:38 AM GMT
Next Story