Home > News Update > नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांनी गाडी अडवल्याने तणाव

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांनी गाडी अडवल्याने तणाव

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांनी गाडी अडवल्याने तणाव
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. पण त्यांना कुठेही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण आले होते. तिथे त्यांनी नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर सोमवारी बराचवेळ युक्तीवाद झाला होता. संतोष परब यांच्या बाजूने एड. प्रदीप घरत आणि नितेश राणे यांच्याकरीता अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. पण मंगळवारी नितेश राणे यांना कोर्टाने जामीन नाकारला. त्यानंतर नितेश राणे यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय़ घेतला आहे.

*कोर्टाबाहेर नाट्य*

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती. पण गाडी का अडवली याचे कारण नितेश राणे यांनी विचारले. त्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला आहे. यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यानंतर मात्र नितेश राणे पुन्हा कोर्टात परतले आहे.

Updated : 1 Feb 2022 9:45 AM GMT
Next Story
Share it
Top