Home > News Update > कन्नट घाटात पोलिसांची वसुली, आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

कन्नट घाटात पोलिसांची वसुली, आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश

कन्नट घाटात पोलिसांची वसुली, आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश
X

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कन्नड घाटात पोलीस ट्रकचालकांकडून पैसे वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांनी उघड केला आहे. पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे थोडे कमी करा अशी विनंती पोलिसाला केली. पण त्यातील एका पोलिसाने शिवीगाळ केल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पोलीस जाळ्यात सापडल्याचे सांगत मोबाईलद्वारे सर्व प्रकार शूट केला.

अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होतो, अशा तक्रारी वाहनचालक तरत आहेत. या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Updated : 25 Nov 2021 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top