Top
Home > Max Political > पनवेल महापौर निवडणूक : भाजपकडून आरपीआयला सत्तेत वाटा

पनवेल महापौर निवडणूक : भाजपकडून आरपीआयला सत्तेत वाटा

पनवेल महापौर निवडणूक : भाजपकडून आरपीआयला सत्तेत वाटा
X

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल (Kavita chautamol) आणि उपमहापौरपदी जगदीश गायकवाड(Jagdish Gaikwad) यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ७८ नगरसेवकांची संख्या असलेल्या पनवेल महापालिकेत भाजपचे (BJP) ५१ नगरसेवक असल्याने वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपची सत्ता कायम राहिली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमल तर उपमहापौरपदी जगदीश भाई गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजप मित्रपक्षासह रिपाइं महानगरपालिकेत सत्तेत असून माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्तेत समान संधी व न्याय दिल्याचे दिसते.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, परेश ठाकूर, सभापती विद्याताई गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कविताताई गायकवाड, रिपाइं पनवेल तालुकाध्यक्ष सिद्धांत गायकवाड आदींसह भाजप - रिपाई कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा...

Fact Check : JNUSU अध्यक्ष आयेशी च्या नक्की कोणत्या हाताला दुखापत झाली?

नवीन CDS (chief of Defense staff) समोरील आव्हानं

युक्रेनच्या त्या विमानाला चुकून पाडलं – इराण

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने पुन्हा एकदा डॉ. कविता चौतमोल यांना संधी दिल्याने त्यांनी महापौर पदाकरिता आपला अर्ज दाखल केला. तर शेकापकडून प्रिया भोईर यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तसंच यावेळी उपमहापौरपदासाठी भाजपा-आरपीआय आघाडीकडून जगदीश गायकवाड यांनी तर शेकाप आघाडीमार्फत सुरेखा मोहोकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, पनवेल महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यानं अपेक्षितपणे महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, तर उपमहापौरपदी जगदीश गायकवाड निवडून आले आहेत.

Updated : 11 Jan 2020 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top