Home > News Update > शंख वाजवून, धूर पसरून कोरोना बरा होतो, भाजप नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शंख वाजवून, धूर पसरून कोरोना बरा होतो, भाजप नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शंख वाजवून, धूर पसरून कोरोना बरा होतो, भाजप नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
X

कोरोना व्हायरसने देशात रौद्र रूप धारण केलेले असताना दररोज नवनवीन शोध घेऊन भाजप नेते लोकांना वेड्यात काढण्याचं काम करतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचे आकडे दररोज मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यातच भाजपचे अनेक नेते कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विचित्र उपाययोजना करा. असे सल्ले लोकांना देत आहेत. विशेष म्हणजे या उपाययोजनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

त्यातील काही लोक गोमूत्र पिण्यासाठी सांगत आहेत. तर काही भाग धूर करून त्या धुराला पवित्र धूर आहे असं सांगून हा धूर हवेतील कोरोना विषाणू नष्ट करतो. असा दावा करत आहेत.

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये मेरठचे भाजपा नेते गोपाल शर्मा आणि काही भाजप समर्थक शंख वाजवून 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव' अशी घोषणा देताना दिसत आहेत.

या पवित्र धुरामुळे विषाणू हवेत पसरण्यापासून रोखेला जाईल, असा दावा गोपाल शर्मा यांनी केला आहे. त्यांनी शंख आणि पवित्र धुरामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल आणि लोक या आजारापासून लवकर बरे होतील.

असं त्याचं म्हणणं आहे.

Updated : 19 May 2021 2:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top