Home > News Update > महाविकास आघाडीचे आणखी एक नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर,प्रताप सरनाईक यांच्याविरोधात याचिका दाखल

महाविकास आघाडीचे आणखी एक नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर,प्रताप सरनाईक यांच्याविरोधात याचिका दाखल

महाविकास आघाडीचे आणखी एक नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर,प्रताप सरनाईक यांच्याविरोधात याचिका दाखल
X

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या रडावर महाविकास आघाडीचा आणखी एक नेता आला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे

प्रताप सरनाईक यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या हायकोर्टात मध्ये पोहोचले होते. याचिका दाखल केल्या नंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाण्यातील विहंग गार्डनचे कथित अनधिकृत बांधकाम आणि बिल्डरला १८ कोटी रुपयांच्या दंडातून मुक्त केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

राणा दाम्प्त्यांनी मातोश्री मध्ये हनुमान चालिसा पठनाचे आव्हान दिले होते.त्याला शिवसैनिकांनी प्रचंड विरोध केला.त्यानंतर राणा दाम्प्त्याला अटक करण्यात आली.खार पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्प्त्याला भेट देण्यास किरीट सोमय्यासुद्धा आले होते.तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला.असा सोमय्यांनी आरोप केला होता.

Updated : 29 April 2022 9:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top