Home > News Update > भाजप नेत्याने कोविड सेंटरमध्ये केला विश्वशांती यज्ञ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार

भाजप नेत्याने कोविड सेंटरमध्ये केला विश्वशांती यज्ञ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोविड नियंत्रणासाठी वैज्ञानिक मार्ग अवलंबण्याचे आवाहन करूनही भाजप नेते मात्र ऐकायला तयार नाहीत. पारनेर तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी कोरोना महामारीतून सुटका व्हावी, रुग्णांना आराम मिळून ते बरे व्हावेत म्हणून एका विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते. पोलिसांनी आता तक्रार दाखल केल्यामुळे ही कोविड सेंटरच संकटात सापडले आहे.अहमदनगरहून सुनील भोंगळ यांचा रिपोर्ट..

भाजप नेत्याने कोविड सेंटरमध्ये केला विश्वशांती यज्ञ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार
X

टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.भाजप नेते सुजित झावरे यांनी याच कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता. या वैज्ञानिक प्रकारा विरोधात आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाले असून तक्रार दाखल झाली आहे.

पारनेर तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी कोरोना महामारीतून सुटका व्हावी, रुग्णांना आराम मिळून ते बरे व्हावेत म्हणून एका विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते. टाकळी ढोकेश्वर गावात माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.भाजप नेते सुजित झावरे यांनी याच कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता.

सध्या कोरोनावर नेमके औषध नसून विज्ञान कमी पडताना दिसत असल्याचे सांगत तालुक्यातील भाजप नेते सुजित झावरे यांनी थेट कोविड केअर सेंटर मध्येच विश्वशांती यज्ञ आयोजित केला होता. जगावर जेव्हा संकटे येतात त्या वेळी अग्नी पेटवून देवाची आराधना केली जाते असे झावरे यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्याने कोविड सेंटरमध्ये केला विश्वशांती यज्ञअंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार तक्रार-झावरे यांच्या विश्वशांती यज्ञाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून विज्ञान युगात या प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे कायद्यानुसार गुन्हा असून याबद्दलची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे अंनिसच्या अॅड रंजना गवांदे यांनी सांगितले आहे. कोरोना आजारावर जगातले वैज्ञानिक औषध शोधत असताना थेट कोविड केअर सेंटर मध्ये यज्ञाचे आयोजन करण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला आहे.राज्यात चर्चेत असलेले आ. निलेश लंके यांचे कोविड सेंटर-नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याची ओळख म्हणजे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तसेच पारनेर विधानसभा क्षेत्रातच पोपटराव पवारांचे आदर्शगाव हिवरेबाजार आहे. सध्या पारनेरचे आ.निलेश लंके यांचे भाळवणी येथील अकराशे बेड चे कोविड सेंटर राज्यात आदर्श कोविड सेंटर म्हणून चर्चेत आहे. तर भाळवणी पासून काही किलोमीटर अंतरावरच सुजित झावरे यांच्या वडिलांच्या नावाने तीनशे बेडचे कोविड सेंटर आहे.

विश्वशांती यज्ञाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून विज्ञान युगात या प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे कायद्यानुसार गुन्हा असून याबद्दलची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे अंनिसच्या अॅड रंजना गवांदे यांनी सांगितले आहे. कोरोना आजारावर जगातले वैज्ञानिक औषध शोधत असताना थेट कोविड केअर सेंटर मध्ये यज्ञाचे आयोजन करण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला आहे. आता कोविड सेंटरमध्येच होमहवन करण्यात आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत तक्रार केली आहे.


Updated : 22 May 2021 4:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top