Home > News Update > भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा

भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा

भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा
X

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने भाजप नेते आणि माजी मंत्री असलेल्या अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ( Dr. Anil Bonde Sentenced three month imprisonment)

भाजप नेते अनिल बोंडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच त्यांनी वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. तसेच त्यावेळी नंदकिशोर काळे यांना मारहाणही करण्यात आली होती. त्याप्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने भाजप नेते अनिल बोंडे यांना तीन महिने कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

राज्याचे माजी कृषीमंत्री म्हणून काम केलेल्या अनिल बोंडे यांनी 2017 मध्ये नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक होत नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. त्याप्रकरणी अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने निकाल देतांना अनिल बोंडे यांना दोषी ठरवत तीन महिने कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (BJP leader and Former Agricultural minister Dr. Anil Bonde has been sentenced by court to three month imprisonment with fine of 20, 000 Rs )

काय आहे प्रकरण?

2017 मध्ये नागरिकांच्या विविध प्रश्नांवर भाजप नेते अनिल बोंडे यांनी आक्रमक होत वरुडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्याप्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. ती सुनावणी मंगळवारी पुर्ण झाली. तर न्यायालयाने अनिल बोंडे यांना दोषी ठरवत तीन महिने कारावासाची आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Updated : 6 April 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top