Home > News Update > भाजप नेत्याची विषाची शेती, मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त ट्वीटमुळे पक्षाने केली हकालपट्टी

भाजप नेत्याची विषाची शेती, मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त ट्वीटमुळे पक्षाने केली हकालपट्टी

भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद शमत नाही तोच भाजप IT cell चे प्रमुख अरुण यादव यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केले आहेत.

भाजप नेत्याची विषाची शेती, मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त ट्वीटमुळे पक्षाने केली हकालपट्टी
X

भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद शमत नाही तोच भाजप IT cell चे प्रमुख अरुण यादव यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केले आहेत.

भाजप नेते अरुण यादव यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट केले आहेत. त्याचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. तसेच अरुण यादवच्या अटकेची मागणी जोर धरु लागली आहे.

अरुण यादव याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी 2018 मध्ये वादग्रस्त ट्वीट केले होते. त्याप्रकरणी अरुण यादवच्या अटकेची मागणी केली जात आहे. तसेच शुक्रवारी दिवसभर अरुण यादव ट्वीटरवर ट्रेंड करत होता. यामध्ये जर अल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबैर याला जुन्या ट्वीटप्रकरणी अटक होऊ शकते तर अरुण यादवला का नाही? असा सवाल नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

भाजप नेते अरुण यादव याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त ट्वीट करताना पेगसोबत पैगंबर यांची तुलना केली आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्येही अरुण यादव याने मशिदींखालील खोदकामाविषयी ट्वीट केले आहे.

तिसऱ्या ट्वीटमध्ये अरुण यादव याने हलाला आणि खोदकामाच्या भीतीचा संबंध जोडला आहे.

अरुण यादव हा हरियाणा भाजपच्या आयटी सेल प्रमुख होता. मात्र या ट्वीटच्या वादामुळे हरियाणा भाजपने अखेर अरुण यादव याची आयटी सेलच्या प्रदेश प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नुपूर शर्मा, साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह साक्षी महाराज या भाजप नेत्यांकडून सातत्याने विखारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख दहशतवादी कृत्याशी संबंधीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे भाजप देशात विषाची शेती करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Updated : 8 July 2022 7:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top