Home > News Update > भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नाही- चंद्रकांत पाटील

भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नाही- चंद्रकांत पाटील

भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नाही- चंद्रकांत पाटील
X

मुंबई// भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात जे काय सुरू आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही असं पाटील म्हणाले. सोबतच बाळासाहेबांची शिवसेना आणि या सध्याच्या शिवसेनेत खूप फरक झाला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना आणि भाजपाने एकत्रं यावे, या युतीला पर्याय नसल्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटल यांनी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटले होते की, ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाही, असं मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं होत. अभिनेते विक्रम गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं होतं. सोबतच शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना – ज्यांना खरच वाटतं की शिवसेना – भाजप युती व्हावी त्यांनी देखील शिवसेना- भाजप युतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले होते.

Updated : 15 Nov 2021 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top