Home > News Update > शिवसेनेला मोठा धक्का! जळगावात राजकारण फिरलं, भाजपच्या फुटीर 12 नगरसेवकांची घर वापसी.

शिवसेनेला मोठा धक्का! जळगावात राजकारण फिरलं, भाजपच्या फुटीर 12 नगरसेवकांची घर वापसी.

शिवसेनेला मोठा धक्का! जळगावात राजकारण फिरलं, भाजपच्या फुटीर 12 नगरसेवकांची घर वापसी.
X

जळगाव महापालिकेच्‍या महापौर निवडणुकीच्‍यावेळी महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. मात्र, सहा महिन्यातच भाजपने महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाची परतफेड केल्याच आज तरी चित्र आहे. महापौर निवडीच्या वेळी भाजपच्‍या 27 नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिला होता. यामुळे महापालिकेत सत्‍तांतर होऊन भाजपच्‍या हातातील सत्‍ता गेली व शिवसेनेचे महापौर व उपमहापौर विराजमान झाले.

मात्र, सहा महिन्‍यातच भाजपच्‍या त्‍या बंडखोर 12 नगसेवकांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश करत घरवापसी करून शिवसेनेला धक्का दिला.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव महापालिकेत राजकीय घडमोडी सातत्‍याने वेगवान होत आहेत. आजच्‍या महासभेत गटनेता निवडीवरून भाजपने तयारी करूनच जोरदार बॅटींग केल्याने शिवसेनेला महासभा तहकूब करण्याची वेळ आली. आणि काही वेळातच भाजपच्या बंडखोर 12 नगरसेवकांनी आमदार गिरीश महाजन यांच्‍या जी. एम. फाउंडेशन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थित प्रवेश केला.

यावेळी आमदार भोळेंनी पून्हा भाजपात नगरसेवक आल्याचे स्वागत केले. यावेळी महानगराध्यक्ष अॅड. सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे संख्याबळ वाढले...

भाजपचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश केला होता. काही महिने उलटल्‍यानंतर तीन दिवसांपूर्वी ३ बंडखोर नगसेवकांनी भाजपात पुन्‍हा प्रवेश केला. आज पुन्हा 12 बंडखोर नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपला सोडून गेलेल्या सदस्यांनी पुन्हा पक्षाची साथ घेतल्याचे आज तब्बल 12 सदस्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केल्याने पक्षाची सभागृहातील सदस्यसंख्या 39 झाली आहे.

विकासासाठी शिवसेना भाजप एकत्र - आमदार सुरेश भोळे

महापालिकेत बहुमत आमचं आहे. महापौर मात्र, शिवसेनेचा आहे, पुढे नेते जे निर्णय घेतील. ते योग्य वेळी घेऊ, आमचा शिवसेनेशी कोणताही वाद नाही, आमचे काही नगरसेवक भाजप सोडून गेले होते ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. आणखीन काही नगरसेवक पुन्हा घरवापसी करतील. असं भाजप आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले

शिवसेनेत जाऊन भ्रमनिरास झाला - बंडखोर नगरसेवकांच्या प्रतिक्रिया -

विकासाच्या मुद्द्यावर आणि वार्डातील काम होतील. ह्या आशेवर आम्ही शिवसेनेत गेलो होतो. मात्र, सहा महिने उलटले काम तर दूरच कोणत्याही मिटिंग ला सत्ताधारी शिवसेना बोलवत नव्हती, आमचा भ्रमनिरास झाला म्हणून आम्ही पुन्हा भाजप मध्ये आलो. असं बंडखोर नगरसेवकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नगरसेवकांची घरवापसी, या फुटीर नगरसेवकांची पुन्हा घरवापसी-

1)मिनाक्षी पाटील, 2) प्रतिभा पाटील, 3)रजंना सपकाळे,4) दत्तू कोळी, 5)प्रविण कोल्हे, 6)शोभा बारी, 7)रुखसाना बबलू खान 8)मीना सपकाळे, 9)सुरेश सोनवणे 10) शेख हसीना बी शरीफ, 11) प्रिया जोहर , 12) कांचन सोनवणे,

एकूण जागा - 75

बहुमतासाठी - 38

आत्ताचे पक्षीय बलाबल

भाजप + भाजप बंडखोर एकूण-39

शिवसेना -15 + भाजप बंडखोर 18 एकूण - 33

MIM - 03

राष्ट्रवादी -00

काँग्रेस -00

Updated : 13 Oct 2021 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top