Home > News Update > गडकरींना पहिला मान नाही ; इतरांची गॅरंटी काय ? - वडेट्टीवार

गडकरींना पहिला मान नाही ; इतरांची गॅरंटी काय ? - वडेट्टीवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या पहिल्या लिस्ट मध्ये १९५ जणांची नावं घोषीत करण्यात आली यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नसल्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.

गडकरींना पहिला मान नाही ; इतरांची गॅरंटी काय ? - वडेट्टीवार
X

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टीची (BJP)जागावाटपाची पहिली लिस्ट (BJP Candidate List 2024) जाहिर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक मंत्र्यांना लोकसभेच्या जागावाटप करण्यात आल्या परंतू या पहिल्या लिस्टमध्ये भाजपचे केद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांचं नाव नसल्यानं विरोधकांकडून जोरदार टीका होतं आहे.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)म्हणाले की " भाजप पक्षात निष्ठावंतांना काठावर तडफत ठेवून उपऱ्यांना मान दिला जात आहे. नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांना पहिला मान दिला जात नसेल तर तर भाजप मधील इतर निष्ठावंतांची गॅरंटी काय ? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखीलं मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. दरम्यान ठाकरे म्हणाले की " गडकरींसारख्या नेत्याचं नाव पहिल्या यादीत नाही. पण ज्यावर बेहिशोबी मालमत्ता आरोप असणारे कृपा शंकर सिंग यांच नाव आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे. मोदी सरकार मध्ये अनेक योजनांचं नामकरण झालंय तसचं जुमलाचं नामकरण आता गॅरंटी झालं आहे. त्यामुले जुमलेबाज गॅरंटी पक्षाला जनता साथ देणार नाही अशी टीका ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

Updated : 5 March 2024 4:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top