Home > News Update > भाजपला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असलेलं सहन होत नाही - यशोमती ठाकूर

भाजपला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असलेलं सहन होत नाही - यशोमती ठाकूर

भाजपला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असलेलं सहन होत नाही - यशोमती ठाकूर
X

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असलेलं सहन होत नाही. त्यांना जे काही करायचे ते करावे. महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचं अतुल भटखळकरांना प्रतिउत्तर महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हा पासून भाजपला सहन होत नाही. राज्यचे मुख्यमंत्री, शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. असे राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अतुल भटखळकर यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले.

काल भाजप नेते अतुल भटखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन सत्तेची सूत्र शरद पवार यांनी हाती घ्यावे असे म्हंटले होते. त्यांना जे काही करायचे आहे ते करावे असे देखील ठाकूर म्हणाल्या.

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील मोझरी या आपल्या गावामध्ये स्वतः सहकुटुंब रांगेत उभे राहून ठाकूर यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी मतदारांशी संवाद साधत लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले.


Updated : 15 Jan 2021 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top