Top
Home > News Update > का हो दादा,...तुमच्या प्रदेश अध्यक्षांना कोरोनाचे नियम लागू होत नाही का?

'का हो दादा',...तुमच्या प्रदेश अध्यक्षांना कोरोनाचे नियम लागू होत नाही का?

का हो दादा,...तुमच्या प्रदेश अध्यक्षांना कोरोनाचे नियम लागू होत नाही का?
X

राज्यात कोरोना वाढत असताना कोरोना नियंत्रणासाठी कडक पावले उचलावी लागतील, असं एकीकडे ठाकरे सरकार म्हणतंय. पण दुसरीकडे याच सरकारमधील मंत्री आणि खासदार हे मोठंमोठे कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. मग कडक निर्बंध आणि कारवाया फक्त सर्वसामान्यांसाठीच का? असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यातील वाढत्या कोरनाच्या परिस्थितीला राजकीय नेत्यांचे कार्यक्रम आणि त्यामुळे होणारी गर्दीही तितकीच जबाबदार आहे. एवढच नाही तर सत्तेत असलेल्या पक्षातील नेतेमंडळी कोरोनाचे नियम पायी तुडवत खाजगी कार्यक्रमात हेजरी लावत असल्याचं आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबूब शेख आणि राष्ट्रवादी युवती प्रदेशध्यक्ष सक्षणा सलगर हे दोन्ही नेते अनेक गर्दीच्या कार्यक्रमात हेजरी तर लावतच आहे, मात्र यावेळी ना मास्क वापरत आहे, ना सोशल डिस्टन्स ठेवत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागील सहा दिवसांपूर्वीचे कार्यक्रम पाहिले तर,त्यांनीही मास्क वापरला नसल्याचे फोटो त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर असल्याचं दिसून येत आहे.

Updated : 2021-02-22T10:18:26+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top