Home > News Update > OBC Reservation: भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

OBC Reservation: भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

OBC Reservation:  भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
X

सोलापूर : ओबीसीच्या राजकीय आरक्षणात महाविकास आघाडी सरकार निष्काळजीपणा करत असल्याचा निषेध सोलापूर भाजपच्या वस्तीच्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा निषेध करीत भाजप शहर व जिल्हाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळा अशा सूचना केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्वरित लपवलेले पुतळे बाहेर काढून जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी सावध होत पुतळे जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, झेडपी सदस्य अरुण तोडकर, आनंद तानवडे, बिज्जू प्रधाने, अमर पुदाले, शंकर वाघमारे, के के पाटील, शशिकांत चव्हाण,प्रणव परिचारक, यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Updated : 15 Sep 2021 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top