Home > News Update > मुंबईच्या रस्त्यांवर बाईकर्सची स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा

मुंबईच्या रस्त्यांवर बाईकर्सची स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा

मुंबईच्या रस्त्यांवर बाईकर्सची स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला धडा
X

मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवरुन पोलिसांनी तपास सुरू करत स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्स शोधून काढले आहे. २ तासांमध्ये पोलिसांनी या लोकांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई केली.

२ तरुणांना बाईकसह ताब्यात घेतले आहे. दोन व्हिडिओंपैकी पहिला व्हिडिओ घाटकोपरमधील आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यातील एक गाडीवर पडतानाही दिसतोय. या मुलांनी स्टंटबाजीचा स्वतचा सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन यापुढे अशी स्टंटबाजी कऱणार नसल्याचे कबूल करुन घेतले आहे. तर दुसरा व्हिडिओ आमच्या प्रतनिधीने शूट केला आहे. या व्हिडिओ पवई भागातील आहे. अशा बाईकर्सवरही कारवाईची गरज आहे.

Updated : 9 Jan 2021 3:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top