Home > News Update > फडणविसाचं मिशन पुन्हा येईनला सुरुवात झाली आहे का?

फडणविसाचं मिशन पुन्हा येईनला सुरुवात झाली आहे का?

फडणविसाचं मिशन पुन्हा येईनला सुरुवात झाली आहे का?
X

बिहार निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत घवघवीत यश मिळवलं आहे. या यशामागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा हातभार आहे. बिहार निवडणूकीत फडणवीस यांनी प्रभारी म्हणून स्थानिक भाजप नेत्यांसोबत चर्चा करुन जी रणनीती आखली. त्या रणनीतीला यश आल्याचं अखेर दिसून आलं. विशेष बाब म्हणजे ही निवडणूक अमित शहा यांच्या अनुपस्थितीत झालेली निवडणूक होती.

त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीला महत्त्व प्राप्त होतं. बिहार निवडणुकीचे आकडे पाहिल्यानंतर बिहार मध्ये नवख्या असलेल्या फडणवीसांनी पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्यामुळं फडणवीसांचं या निमित्ताने राजकीय कौशल्य दिसून येते. अंतिम निकाल RJD 75 BJP 74 JDU 43 INC 19 LJP 01 इतर 31 NDA 125 महागटबंधन 110 इतर 8 या निकालानंतर फडणवीस यांनी ट्विट करत बिहारच्या जनतेचे धन्यवाद मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.




मात्र, बिहार सारख्या अनोळखी राज्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या फडणवीसांचं मिशन 'मी पुन्हा येईन' ला पक्ष आता बळ देणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याशी बातचित केली... बिहारमधील विजयामुळे एकूणच भाजपला अतिशय उत्साह आला आहे. आणि त्यानंतर पश्चिम बंगालची निवडणूक असली तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अभियान सुरु करता येईल असं वाटतं. खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मी बरा झालो असून मी आता ठिकठिकाणी जाणार आहे. आणि सक्रिय होणार आहे. असं सांगितलं आहे.

अर्थात महाराष्ट्रामधील निवडणुकांना भरपूर वेळ असला तरी त्या पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेळ्या ठिकाणी निवडणूका आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आपला टेम्पो वाढवायचा असेल तर फडणवीस तो प्रयत्न करतील. बिहारमधील निवडणुकांच्या यशामध्ये फडणवीसांचं श्रेय जर काही असेल तर ते अतिशय थोडं आहे. परंतू ते फुगवून सांगण्याचा ही प्रयत्न होईल. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील जे प्रश्न आहे. मुख्यत: शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन फडणवीस प्रयत्न करतील. यात शंका नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. कपाशीची खरेदी होत नाही. अशा प्रकारचे मुद्दे मांडायला सुरुवात केली आहे. आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नांची शिकस्त करतील. यात शंका नाही. त्या दृष्टीने फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्याची तयारी महाविकास आघाडी ने करणं गरजेची आहे.

अनेक वर्ष महाराष्ट्राच्या ग्राउंड झिरोवरुन राजकीय पत्रकारिता करणारे मॅक्समहाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्याशी बातचित केली असता, ते म्हणतात... राजकारणात काहीही होऊ शकतं. हे सरकार शरद पवारांची जोपर्यंत मर्जी आहे. तोपर्यंतच सत्तेत आहे. त्यामुळं हे सरकार पुढे 3 वर्ष टिकेलही. मात्र, यामध्ये शरद पवार सत्तेत राहण्यासाठी काय काय करतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार भाजप सोबतही जाऊ शकतात. शिवसेनेसोबतही तीन वर्ष सत्तेत राहू शकतात. महाराष्ट्रात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशी मत विलास आठवले यांनी मांडली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश प्रसिद्ध माध्यमं प्रमुख विश्वास पाठक यांच्याशी बातचित केली... बिहारची परिस्थितीची वेगळी होती.

आमचं बिहारमध्ये नितिश कुमार यांच्याशी राजकीय गटबंधन वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. बिहारमध्ये आम्ही निवडणुकीपुर्वीचं कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितिश कुमारचं राहतील अशी घोषणा केली होती. तशा पद्धतीने नितिश कुमारचं मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर 2014 ला आणि 2019 ला महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सूत्र समोर ठेवून पक्षाने आपली भूमिका वारंवार मांडली आहे. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेने जनमताचा आदर केला नाही. शिवसेनेने स्वत:च्या स्वार्थासाठी धोका दिला. आणि हे सरकार स्वत:च्या कर्मानेच पडेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका निभावत आहोत. असं मत पाठक यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 11 Nov 2020 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top