Home > News Update > नितीश कुमार यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या रेणू देवी कोण आहेत?

नितीश कुमार यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या रेणू देवी कोण आहेत?

नितीश कुमार यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या रेणू देवी कोण आहेत?
X

आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार 7 व्यांदा शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या शपथविधी पेक्षा खरी चर्चा उपमुख्यमंत्री पदाची सुरु आहे. नितिश कुमार यांच्या सोबत दोन मंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. यामध्ये रेणु देवी यांचं नाव आघाडीवर आहे. रेणू देवी...

रेणू देवी यांचं शिक्षण देखील फारसं नाही. त्या चौथ्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी आपल्या राजकीय जिवनाची सुरुवात 1988 पासून केली. त्यांची आई संघ परिवारात सक्रिय होती. 62 वर्षाच्या रेणू देवी यांच्या पतीचं निधन झालं आहे.

त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या बिहारमध्ये 2005 ते 2009 मध्ये खेळ, कला आणि संस्कृती मंत्री राहिल्या आहेत...

कोण आहेत तारकिशोर प्रसाद...?

तारकिशोर प्रसाद यांचं वय 64 वर्ष आहे. त्याचं शिक्षण 12 वी पर्यंत झालं आहे.

तारकिशोर प्रसाद यांच्या पत्नीचं नाव रेणु प्रसाद आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. ABVP मध्ये त्यांनी अनेक पद सांभाळलेली आहेत. ते चौथ्य़ांदा विधानसभेववर निवडून गेले आहेत.

तारकिशोर प्रसाद 1980 च्या दशकात राजकारणात सक्रीय झाले. 2005 मध्ये कटिहार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा बिहार विधानसभेवर गेले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार JDU च्या वतीनं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शिवाय विजेंद्र यादव, अशोक चौधरी, शीला मंडल आणि मेवालाल चौधरी शपथ घेऊ शकतात. भाजप च्या वतीनं मंगल पांडेय, जीवेश मिश्रा, रामप्रीत पासवान, अमरेन्द्र प्रताप सिंह आणि रामसूरत राय शपथ घेणार आहेत.

साधारण पणे आज 15 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दोन उप मुख्यमंत्री यांच्यासह JDU आणि BJP चे प्रत्येकी पाच-पाच मंत्री शपथ घेणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत अंतिम निकाल पाहिले असता तेजस्वी यादव यांच्या लाल टेन ने भाजप आणि जेडीयूला आव्हान देत निकालाची चुरस मोठ्या प्रमाणात वाढवली खरी मात्र, अंतिम सामन्यात NDA ने बाजी मारली. मात्र, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक 75 जागा मिळवत बिहार निवडणूकीत एक नंबर चा पक्ष ठरला. तर 74 जागा मिळवत भाजप ने बिहारमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.

एनडीए ने नितिश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं. 125 जागा मिळवत एनडीएने पुन्हा एकदा बिहार मध्ये सत्ता मिळवली.

Updated : 16 Nov 2020 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top