Home > News Update > भाजपची सत्ता असणाऱ्या राज्याचा ‘एनआरसी’ मंजूर करण्यास नकार, विधानसभेत प्रस्ताव मंजूर

भाजपची सत्ता असणाऱ्या राज्याचा ‘एनआरसी’ मंजूर करण्यास नकार, विधानसभेत प्रस्ताव मंजूर

भाजपची सत्ता असणाऱ्या राज्याचा ‘एनआरसी’ मंजूर करण्यास नकार, विधानसभेत प्रस्ताव मंजूर
X

CAA, NRC आणि NPR च्या मुद्यावरुन मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बिहारमध्ये भाजप सोबत सत्तेत असलेल्या जदयूने NRC च्या विरोधात केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारच्या विधीमंडळात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीविरोधात (एनआरसी) ठराव मंजूर करुन मोदींना धक्का दिला आहे. नितीश कुमार यांनी CAA कायद्याला पाठींबा दिला आहे. मात्र, NRC ला विरोध केला आहे. तसंच एनपीआर नव्या नियमांनुसार न करता जुन्या पद्धतीनेच करण्याचं त्यांनी निश्चित केलं आहे.

NPR म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात जनगणना नवीन पद्धतीने करण्यास मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी विरोध केला आहे. २०१० च्या फॉरमॅटनुसार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करण्याबाबतचा ठरावही बिहारच्या विधीमंडळात मंजूर करण्यात आला आहे. तसंच तसेच एनपीआरमधील काही नियमांमध्ये बदले करण्यात यावा यासाठी आपण केंद्र शासनाला पत्र लिहिल्याचं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.

Updated : 25 Feb 2020 4:38 PM GMT
Next Story
Share it
Top