Home > News Update > Corona Update : चिंताजनक..! कोरोना रुग्णसंख्या साडेतीन लाखांच्या उंबरठ्यावर, मृत्यूसंख्येत मोठी वाढ

Corona Update : चिंताजनक..! कोरोना रुग्णसंख्या साडेतीन लाखांच्या उंबरठ्यावर, मृत्यूसंख्येत मोठी वाढ

देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर गेल्या 24 तासात देशात 3 लाख 47 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने देशाची चिंता वाढली आहे.

Corona Update : चिंताजनक..! कोरोना रुग्णसंख्या साडेतीन लाखांच्या उंबरठ्यावर, मृत्यूसंख्येत मोठी वाढ
X

देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने टेन्शन वाढवले आहे. गेल्या 24 तासात देशात 3 लाख 47 हजार 254 नवे रुग्ण आढळून आले. तर ही रुग्णसंख्या गुरूवारच्या तुलनेत 29 हजार 722 इतकी आहे. गुरूवारी देशात 3 लाख 17 हजार 532 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र गेल्या 24 तासात जवळपास तीस हजार रुग्ण वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासात देशात 2 लाख 51 हजार 777 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच देशात आतापर्यंत 4 लाख 88 हजार 396 कोरोना बाधित मृतांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 इतकी झाली आहे.

देशात 20 लाख 18 हजार 825 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत देशात 160 कोटी 43 लाख 70 हजार 484 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 9 हजार 692 इतके रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरीक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले की, राज्यात कोरोना त्सुनामीसारखा पसरत आहे. तर हा प्रसार ओमायक्रॉनमुळे झाला आहे. याबरोबरच मुंबई आणि दिल्लीत तिसरी लाट उच्चांकावर आली आहे. ही लाट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उच्चांक गाठेल. तसेच ही लाट डेल्टाच्या तुलनेत सौम्य असेल. यात चिंताजनक बाब म्हणजे राज्यात अजूनही डेल्टाचा प्रादुर्भाव असल्याने नागरीकांनी खबरदारी घ्यावी. तसेच प्रत्येक नागरीकाचा जीव महत्वाचा असल्याने सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच लसीकरण करून घ्यावे, ज्यामुळे कोरोना किंवा ओमायक्रॉनची बाधा झाली तरी त्याची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होईल, असे मत व्यक्त केले.

Updated : 21 Jan 2022 4:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top