Home > News Update > आर आर आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर सांगलीमध्ये मोठी जबाबदारी

आर आर आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर सांगलीमध्ये मोठी जबाबदारी

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आता राजकीय रिंगणात वडिलांचा वारसा पुढे नेताना दिसत आहे.

आर आर आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर सांगलीमध्ये मोठी जबाबदारी
X

सांगली // राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आता राजकीय रिंगणात वडिलांचा वारसा पुढे नेताना दिसत आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकांमध्ये रोहित पाटील चांगलेच सक्रिय झालेत. 'आता माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा देत रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ रोहित पाटील यांच्या हस्ते पार पडला. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे. याठिकाणी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादी विरोधात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.

महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी विश्वासात न घेता भाजपाशी आघाडी केल्याने या ठिकाणी ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडी, अशी होत आहे.

यावेळी आयोजित प्रचार सभेमध्ये अनेक नेत्यांनी 25 वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं मत व्यक्त केलं. हा धागा पकडत रोहित पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की, 'आपण सगळ्यांनी सांगितले 25 वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आलेत. पण आता माझं वय 23 आहे आणि 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही. याची खात्री देतो,असा गर्भित इशारा आपल्या विरोधकांना दिला. रोहित पाटील आता निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सांगलीकरांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 16 Dec 2021 12:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top