Home > News Update > Hijab case : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Hijab case : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातून सुरू झालेल्या हिजाब वादाचे लोण देशभर पसरले होते. तर कर्नाटक राज्य सरकारने शाळा महाविद्यालयात धार्मिक पोशाखाला बंदी घातली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले होते. त्या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे.

Hijab case : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
X

कर्नाटक राज्यातील उडूपी जिल्ह्यात सुरू एका महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. तर कर्नाटक सरकारला राज्यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याची नामुष्की पत्करावी लागली होती. त्यानंतर हे प्रकरणी मुस्लिम मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय दिला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी मुस्लीम मुलींनी दाखल केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजमध्ये गणवेश घालायलाच हवा. त्याला नकार देता येणार नाही, असे म्हटले आहे. तर या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कर्नाटक राज्य सरकारने या प्रकरणात शबरीमाला प्रकरणात जो नियम लागू केला होता. तोच नियम हिजाब प्रकरणातही लागू करण्याची मागणी केली होती.

हायकोर्टाच्या निर्णयातील तीन मोठ्या गोष्टी.

• विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये गणवेश घालण्यास नकार देता येणार नाही.

• शाळा किंवा कॉलेजला स्वतःचा गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे.

• हायकोर्टाने हिजाब वादाशी संबंधित सर्व 8 याचिका फेटाळून लावल्या आहेत.



मागील सुनावणी दरम्यान काय झाले

सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांनी या प्रकरणावर 11 दिवस सलग सुनावणी केली होती. हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले होते की, इस्लाममध्ये मुलींना डोके झाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये मुलींना हिजाब घालण्यास नकार देणं चुकीचा आहे. त्यानंतर राज्याचे महाधिवक्ता (एजी) प्रभुलिंग नवदगी यांनी सरकारतर्फे खंडपीठासमोर युक्तिवाद केला त्यावेळी त्यांनी हिजाब ही इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही अस म्हंटल होतं.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने केलेल्या युक्तिवादाला पुष्टी देण्यासाठी पवित्र कुराणची प्रत मागितली होती.

हिजाब वाद सुरू कसा झाला?

कर्नाटकात हिजाबचा वाद १ जानेवारीपासून सुरू झाला होता. उडुपीमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे महाविद्यालयातील वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाने नवीन गणवेश धोरण हे कारण सांगितले होते. यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुलींचा असा युक्तिवाद होता की, त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

हिजाब विरुद्ध भगवा वाद कसा सुरू झाला?

कर्नाटकातील कुंदापुरा महाविद्यालयातील 28 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती की, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. या मुलींनी कॉलेजच्या गेटसमोर बसून धरणेही सुरू केले होते. एक मुलगी कॉलेजमध्ये हिजाब घालून जात असताना काही भगवा गमजा घातलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या होत्या त्यानंतर हा वाद सर्वत्र चिघळला होता.

Updated : 15 March 2022 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top