Home > News Update > Big Breaking : रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Big Breaking : रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Big Breaking : रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
X

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुणे आणि मुंबईतील कुलाबा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांन मोठा दिलासा दिला आहे.

देंवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभागाने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता.

काँग्रेस नेते नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, एकनाथ खडसे, बच्चू कडू यांचे फोन टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्याप्रकरणी पुणे शहरात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मुंबईतील कुलाबा येथेही रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामध्ये पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे कुलाबा येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज्य सरकारने खटला चालवण्यास मंजूरी नाकारली होती.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर घडल्या घडामोडी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र यानंतर आता उच्च न्यायालयानेही रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले फोन टॅपिंग आणि गोपनिय अहवाल फोडल्याचे गुन्हे रद्द करण्याचे निर्णय घेतला आहे.

Updated : 8 Sep 2023 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top