Home > News Update > प्रवीण दरेकर यांचा जामीनअर्ज फेटाळला, मुंबै बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

प्रवीण दरेकर यांचा जामीनअर्ज फेटाळला, मुंबै बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

प्रवीण दरेकर यांचा जामीनअर्ज फेटाळला, मुंबै बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी
X

मुंबई : मुंबै बँकेत मजूर असल्याचे दाखवून संचालकपद मिळवल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. पण त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. यानंतर सरकारने वेगाने कारवाई करायला हवी आणि संचालक मंडळ त्वरित बरखास्त करावे अशी मागणी सहकार सुधार समितीच्या वतीने बँक कामगार नेते विश्वास उटगी आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धंनजय शिंदे यांनी केली आहे. तसेच सर्व घोटाळेबाजांचा कडक बंदोबस्त करून सहकारातील ही घाण साफ करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई बँकेत घोटाळ्याच्या मालिकाच असून संचालक मंडळाने कोट्यवधींची माया त्यातून जमवली असल्याचा आरोपही आप आणि विश्वास उटगी यांनी केला आहे. "बँकेतील घोटाळ्यांची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने 2015 मध्येच तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. पण तत्कालीन सरकारने ते दडपून ठेवले. त्यामुळेच संचालक मंडळाचे मनोधैर्य वाढले. मग त्यांनी बोगस कार्पोरेट कर्जे, कर्जासाठी कमिशन पद्धती, खरेदी विक्री प्रकरणात घोटाळे, मजूर संस्थांना बोगस कर्जे देऊन कोट्यवधींची रक्कमेची हेराफेरी, नोकर भरतीत प्रचंड मोठा घोटाळा, असे एकापेक्षा एक मोठे घोटाळे खुद्द लेखा परीक्षण अहवालातून उघडकीस आले आहेत" असाही आरोप त्यांनी केला आहे.

पण या घोटाळाबाजांना पाठीशी घालण्याचे काम तत्कालीन भाजप सरकारने केले. तर प्रवीण दरेकर आणि त्यांचे साथीदार गेले अनेक वर्षे खोट्या संस्था काढून, त्यात बोगस कागदपत्रे देऊन सभासद झालेत, त्या जोरावर वर्षनुवर्षे ते सरकार, मुंबई बँकेचे ठेवीदार, सभासद यांना फसवत आहेत. त्याला सहकार विभागाचे काही अधिकारी मदत करत आहेत. एवढी फसवणूक करूनही ते बिनधास्त वावरत आहेत. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाने प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई झाल्यास नक्कीच सत्याचा विजय होईल, असे विश्वास उटगी यांनी म्हटले आहे. तसेच कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

Updated : 25 March 2022 2:37 PM GMT
Next Story
Share it
Top