Home > News Update > ७० लाख जप्त करत घाटकोपरमधून निवडणूक आयोगाची मोठी कारवाई...!

७० लाख जप्त करत घाटकोपरमधून निवडणूक आयोगाची मोठी कारवाई...!

७० लाख जप्त करत घाटकोपरमधून निवडणूक आयोगाची मोठी कारवाई...!
X

Mumbai : राज्यात नुकतंच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामुळे आता राज्यातल्या राजकीय घडामोडीने चांगलाच वेग धरला आहे. आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने गंभीर पावले उचलत आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कारवाईची मोहिमच राबवली आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या पंतनगरमध्ये निवडणूक आयोगाकडुन मोठी कारवाई करण्यात आली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ७० लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.

राज्यात निवडणूकीचे रणशिंग फुंकले नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ७० लाखांची रोख रक्कम इलेक्शन सेलच्या सर्विलेन्स स्कॉडकडून जप्त करण्यात आली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या या दोघांची चांगलीच कसून तपासणी करण्यात येत आहे.

इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये दिपक निषाद आणि अतुल निषाद हे दोघे भाऊ असून दोघांपैकी दिपक निषाद हा पेशाने सी.ए. (chartered accountant) असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीदरम्यान गाडीत ही रक्कम आढळली आहे.

निवडणूकीच्या काळात हे पैसे वापरले जाणार असल्याची टीप निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली होती. शनिवारी (१६ मार्च) रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकांचा काऱ्यक्रम जाहीर करत तारखांची घोषणा केली. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये ही रक्कम सापडल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली. त्यानंतर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी संबंधित रक्कम जप्त केली असून त्यांच्याकडून पुढील चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Updated : 20 March 2024 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top