Home > News Update > दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी केली अटक
X

पिंपरी चिंचवड // दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिंतागण गार्डन, कासारवाडीत ही कारवाई करण्यात आली आहे. कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रु ड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड यासारखे मनाई असलेले साहित्य जवळ बाळगून आरोपी दरोड्याच्या तयारीत होते.

पिंपरी चिंचवडच्या कासरवाडी भागात रात्रीच्या सुमारास लुटमार आणि दरोडा घालण्याच्या तयारीत हे सहा जण होते. मात्र, पिंपरी चिंचवड भोसरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लोखंडी कोयते, लाकडी दांडके, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी हातोडी, मिरचीपूड व 90 हजार रुपये किमतीची एक रिक्षा मिळून आली.

आरोपींची चौकशी करत असताना ते पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत नव्हते. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर आरोपींनी दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत होतो, असा खुलासा आरोपींकडून करण्यात आला. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात कलम 399,402 व आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

Updated : 14 Nov 2021 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top