Home > News Update > रक्तदान करून तरुणांनी साजरी केली भीम जयंती

रक्तदान करून तरुणांनी साजरी केली भीम जयंती

रक्तदान करून तरुणांनी साजरी केली भीम जयंती
X


मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये रक्तदान करुन साजरी केली भीम जयंती..

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती... या निमित्ताने सर्व आंबेडकरी अनुयायांनी यंदाची जयंती ही विचारांची जयंती म्हणून साजरी केली आहे.

मुंबईमध्ये आंबेडकरी समाजाचे केंद्रस्थान असलेल्या माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नेहमीच मोठ्या जल्लोशात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. या जयंतीला तसा मोठा इतिहास आहे. त्यामुळं यंदाच्या जयंतीला माता रमाबाई आंबेडकरनगरमध्ये जयंती कशी साजरी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सध्या राज्यात कोरोनाची साथ सुरु आहे. राज्याला रक्ताची गरज आहे. अशा परिस्थितीत रमाबाई आंबेडकर येथील तरुणांनी रक्तदान करत सामाजिक जाणीवांची भीम जयंती साजरी केली. जगावर आलेलं करोना महामारीचे संकट आणि राज्यातला कमी होणारा रक्तसाठा पाहता या तरुणांनी यंदाची जयंती लोकांच्या रक्षणासाठी रक्तदान करून आरोग्य व्यवस्थेला मदतकार्य करण्याच्या विचाराने साजरी केली आहे.

दरम्यान, रक्तदान केलेल्या आंबेडकरी तरुणांशी मॅक्स महाराष्ट्रने संवाद साधला. 


रक्तदान केलेले प्रफुल्ल आव्हाड सांगतात की, 


आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी रक्तदान केलं. जग संकटात असताना आपण जगाची मदत करायला मदत करावी. संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले असताना आपण माणूस म्हणून एकमेंकांची मदत कशी करता येईल. हा विचार माझ्या मनात सतत असतो.

मी कॅन्सर टाटा मेमोरियल रुग्णालयात काम करतो. दररोज रुग्णांना मरणाच्या यातना भोगताना पाहतो. या रुग्णांचा त्रास बघवत नाही. त्यांच्यासाठी मी रुग्णालयातही माझ्याकडून मदत कशी करता येईल हे पाहतो. सध्या करोनाच्या भोवऱ्यात तुम्ही-आम्ही सर्वजण अडकलो आहोत... त्यात राज्यातली सद्यस्थिती पाहता रक्तसाठा कमी झालेला आहे. आमच्या ही रुग्णालयातही रक्तपुरवठा कमी झालेला आहे. टाटा रुग्णालयातर्फे मी ही अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे रक्त आणि रुग्णांचं नातं हे किती महत्त्वपूर्ण आहे याची मला खात्री आहे.

आपण डॉ. आंबेडकर तर नाही बनू शकत पण त्यांच्या विचारांचे वाहक बनण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. हाच ध्यास मनाशी घेऊन यंदाची जयंती आम्ही रमाबाई नगरमधील तरुणांनी करोनाचं संकट पाहता रक्तदान शिबिर आयोजित केलं. तसेच आमची पुढील आंबेडकर जयंती ही आंबेडकरी विचारधारेलाच समर्पित असणार आहे. बाबासाहेब एक विचार आहेत. आणि विचार रमाबाई आंबेडकरनगरने नेहमी कायम जपला आहे.

असं मत प्रफुल्ल आव्हाड यांनी व्यक्त केलं.

Updated : 14 April 2021 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top